9 मे रोजी इस्लामपूरमध्ये शून्य सावली दिवस बरेच दिवस आपण शून्य सावली दिवसाविषयी WhatApp व Facebook वर पोस्ट वाचत आहोत. आपण देखील आपल्या गावात वा शहरात शून्य सावलीचा दिवस कोणता हे खालील सूत्राचा वापर करुन सांगू शकता... शक्यतो साइंटिफिक क्यालकुलेटर चा वापर करा. n={sin^-1(latitude÷23.45)×(365.25÷360)} -284 यात n= १ जानेवारी हा पहिला दिवस घेतला तर, सूत्रातुन आलेले उत्तर तेवढ्या क्रमांकाचा दिवस समजावे. उदा. इस्लामपूर १७.०५०० अंश या अक्षवृत्तावर आहे. यानुसार .... n= { sin^-1(17.0500÷23.45) × (365.25÷360)} -284 या सूत्रानुसार इस्लामपूरची किंमत येते, -२३६.६८ म्हणून ३६५.२५ मधून २३६.६८ वजा करा, आता उरते १२८.५७ म्हणजेच इस्लामपूरला वर्षाच्या १२८.५७ व्या दिवशी सूर्य डोक्यावर येईल. आता: जानेवारी = ३१ दिवस फेब्रुवारी = २८ दिवस मार्च = ३१ दिवस एप्रिल = ३० दिवस -------------------------------- एकूण = १२० दिवस म्हणजेच एप्रिल पर्यंत १२० गेले, (फेब्रुवारी लीप इयर असल्यास २९ दिवस पकडावेत) उरले आता ८.५७ दिवस.. म्हणून इस्लामपूरला मे महिन्याच्या ८.५७ व्या दिवशी येईल, म्
Comments
Post a Comment