शून्य सावली दिवस । Zero Shadow Day
9 मे रोजी इस्लामपूरमध्ये शून्य सावली दिवस
बरेच दिवस आपण शून्य सावली दिवसाविषयी WhatApp व Facebook वर पोस्ट वाचत आहोत. आपण देखील आपल्या गावात वा शहरात शून्य सावलीचा दिवस कोणता हे खालील सूत्राचा वापर करुन सांगू शकता...
शक्यतो साइंटिफिक क्यालकुलेटर चा वापर करा.
n={sin^-1(latitude÷23.45)×(365.25÷360)} -284
यात n= १ जानेवारी हा पहिला दिवस घेतला तर, सूत्रातुन आलेले उत्तर तेवढ्या क्रमांकाचा दिवस समजावे.
उदा. इस्लामपूर १७.०५०० अंश या अक्षवृत्तावर आहे. यानुसार ....
n= { sin^-1(17.0500÷23.45) × (365.25÷360)} -284
या सूत्रानुसार इस्लामपूरची किंमत येते, -२३६.६८
म्हणून ३६५.२५ मधून २३६.६८ वजा करा,
आता उरते १२८.५७
म्हणजेच इस्लामपूरला वर्षाच्या १२८.५७ व्या दिवशी सूर्य डोक्यावर येईल.
आता:
जानेवारी = ३१ दिवस
फेब्रुवारी = २८ दिवस
मार्च = ३१ दिवस
एप्रिल = ३० दिवस
--------------------------------
एकूण = १२० दिवस
म्हणजेच एप्रिल पर्यंत १२० गेले, (फेब्रुवारी लीप इयर असल्यास २९ दिवस पकडावेत) उरले आता ८.५७ दिवस..
म्हणून इस्लामपूरला मे महिन्याच्या ८.५७ व्या दिवशी येईल, म्हणजेच ९ मे रोजी शून्य सावलीचा दिवस अनुभवता येईल. वास्तविक पाहता २ दिवस आधी आणि २ दिवस नंतर सुद्धा आपल्याला शून्य सावली अनुभवता येते.
- डॉ. सचिन हुदले इस्लामपूर
Comments
Post a Comment